
माझी वसुंधरा अभियान
राज्य शासनाद्वारे आयोजित माझी वसुंधरा अभियान 1.0 मध्ये ठाणे महानगरपालिकेस अमृत शहराच्या गटात प्रथम पारितोषीक प्राप्त झालेले आहे. तसेच, सदर पारितोषीक रकमेच्या विनियोगाची कार्यपद्धती शासनाद्वारे निश्चित करण्यात आलेली असून त्यापैकी काही रक्कम महापालिका क्षेत्रातील नागरिकांचा अभियानामध्ये सहभाग वाढविणे व सदर रक्कम बक्षिस स्वरुपात वितरीत करण्यास निर्देशित आहे. त्यानुसार सदर स्पर्धेचे आयोजन ठाणे महानगरपालिकेद्वारे महापालिका क्षेत्रात करण्यात येत आहे.
माझी वसुंधरा अभियानाचा मूळ पाया हा निसर्गातील पृथ्वी, वायु, जल, अग्नी व आकाश या पंचतत्वावर आधारीत आहे. त्याच धर्तीवर ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध घटकांमध्ये उदा. गृहसंकुले, शैक्षणिक संस्था, वाणिज्य आस्थापना, औद्योगिक संस्था, इतर शासकीय कार्यालये/महाविद्यालये, इ. घटकांमध्ये निसर्गातील पंचतत्वावर आधारीत बाबींचा विचार करुन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
सदर स्पर्धेच्या आयोजनामुळे गृहसंकुले, शालेय संस्था, वाणिज्य आस्थापना, औद्योगिक संस्था, इतर शासकीय कार्यालये/ महाविद्यालये, इ. पातळ्यांवर राबविण्यात येणा-या पर्यावरण संवर्धनीय उपक्रमांना प्रोत्साहन देऊन सदर संस्था/नागरिकांना ठाणे शहराच्या पर्यावरण संवर्धनात सहभागी करुन घेता येईल.
या स्पर्धेमुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील उत्कृष्ट प्रकल्प ठाणे महानगरपालिकेस शासनाच्या मूळ माझी वसुंधरा अभियानामध्ये सहभागी करुन घेता येतील.
स्पर्धेचे स्वरूप माहितीसाठी pdf डाउनलोड करा